त्याच आयुष्यात येण असच अवचित झाल पण तो आला आणि आयुष्य बदललं .कधीच वाटल नव्हत अस माझ्याबरोबर होईल या क्षणाला मला जे वाटतंय ते काय आहे ते फक्त मीच अनुभवू शकते .तो आला आणि आयुष्य झाला. प्रेमापेक्षाहि जास्त अस कायतरी त्याने माझ्यात निर्माण केलाय प्रेम तर नक्कीच नाही आहे पण जी त्याच्या बाबतची ओढ आहे ती इतर कोणाबाबत तशी वाटत नाही.
त्याच्याबरोबरचा प्रत्येक दिवस म्हणजे दुपारपासून रात्रीपर्यंत सगळा वेळ त्याच्यापासूनच सुरु होऊन त्याच्यावरच संपलेला खरच अस माझ्या आयुष्यात होईल अस कधीच वाटल नव्हत खूप छोट्या छोट्या गोष्टी त्याच हसण त्याच माझ्याबरोबर असण सगळच नवख .........
प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी अस असाव ज्याने आपल आयुष्याच बदलाव प्रेम कि मैत्री हे नाही माहित पण त्याच असणंच हे माझ्या असण्याच खर कारण असाव अस वाटत.